दहशतवादी मसूद अझर पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकला
पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर यानं पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकलीये.
मुंबई : पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर यानं पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकलीये. रमजान महिन्यात लष्करानं अतिरेक्यांसोबत शस्त्रसंधी केलीये. ही शस्त्रसंधी म्हणजे अतिरेक्यांना घुसखोरी करण्याची मोठी संधी असल्याचं अझरनं म्हटलंय. त्याच्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आलीये. यात शस्त्रसंधी म्हणजे भारतीय लष्कराची अगतिकता असल्याचा जावईशोध अझरनं लावलाय. कैदेत असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांना सोडवण्याची दर्पोक्तीही त्यानं केलीये.