श्रीनगर : दहशतवादी कारवाईबाबत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. जम्मू-कश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag) सुरक्षा दलाने (Security Forces) मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा दारुगोळा जप्त केला आहे. यावेळी काही शस्त्रेही सापडली आहेत. दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट होता. त्यांचा हा दहशतवादी हल्ल्याचा कट भारतीय लष्कराने उधळून लावला आहे. (Terrorists Hideout Busted In Anantnag by Security Forces jammu kashmir arms ammunition recovered )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा ढाबा हल्ल्याची योजना आखणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर सुरक्षा दलाने अनंतनागमध्ये दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागेचा भांडाफोड केला आहे. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणापासून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.


असे सांगितले जात आहे की हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत  होते. परंतु सुरक्षा दलाला आधीच काश्मिरमधील दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण सापडले आहे. (Terrorists Hideout Busted In Kashmir) सुरक्षा दलाने घटनास्थळावरून 3 एके 56 रायफल, 2 चिनी पिस्तूल, 2 ग्रेनेड, एक दुर्बिणी, मॅग्झीन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.


याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील बारजुला भागात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी शहीद झाले होते.


शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात मोठे यश मिळाले होते. झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक कर्मचारी शहीद झाला. दरम्यान, सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांकडून 1 पिस्तूल आणि 2 एके-47 रायफल जप्त केल्या आहेत.


शुक्रवारी पहाटे सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस शोपियां जिल्ह्यात शोधमोहीम राबवित होते. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. याला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले.


काश्मीरमध्ये दहशतवादी डोके वर काढत असतील तर सुरक्षा दलाने कडक भूमिका घेतली आहे. अनेक दहशतवाद्यांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात काश्मीरमध्ये दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.