आनंदाची बातमी : पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या लस `या` टप्प्यात
लवकरच मिळणार कोरोनावर लस
मुंबई : ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेला भाषणात कोरोनावर भारतात तीन लस विकसित होत असल्याचं सांगितलं. यामुळे भारतीयांना लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याचं समजतं. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनावर भारत लवकरच लस विकसित करेल यावर साऱ्यांचाच विश्वास आहे.
या तिन्ही लस कोणत्या टप्प्यात आहेत. याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधानांनी देशाला स्वातंत्र्यदिनी जनतेला आश्वासन दिले होते. ते म्हणाले होते की, 3 लसी भारतात विकसित केल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यापैकी एक आज किंवा उद्या फेज 3 चाचणी दाखल करेल. अन्य 2 फेज 1 आणि 2 चाचणी आहेत, अशी माहिती एनआयटीआय योग व्हीके पॉल यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वॅक्सिनवर देशातील वैज्ञानिक ऋषीमुनीप्रमाणे तपस्या करत आहेत. वॅक्सीनचे काम मोठ्या पातळीवर सुरु आहे. तीन वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यावर आल्या आहेत. वैज्ञानिकांची अनुमती आल्यावर हे वॅक्सिन देशभरात पोहोचवले जाईल. हे वॅक्सिन शेवटच्या टप्प्यापर्यंत कसे पोहोचेल याची सर्व व्यवस्था केल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
कौशल्यवृद्धी म्हणजे आत्मनिर्भर भारत...आत्मनिर्भर म्हणजे आत्मविश्वास आहे. भारत अंतराळ क्षेत्रातही आत्मनिर्भर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर कृषी आत्मनिर्भर शेतकरीचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. बंधनातुन शेतकऱ्यांना मुक्त केलं असून शेतकरी कुठेही शेतमाल विकू शकतात असे ते म्हणाले. श्रमाला प्रतिष्ठा द्या. श्रमिकांनी स्वत:चा कौशल्य वाढवा असे आवाहनही त्यांनी केले.