जयपूर : एका मुलीने आपल्या विधवा आईचे पुन्हा लग्न लावून समाज्यात एक नवा पायंडा घातला आहे. गीता अग्रवाल असे या विधवा महिलेचे नाव असून त्यांचे पती मुकेश गुप्ता यांचा मे २०१६ मध्ये हृद्यविकाराने मृत्यू झाला. गीता या पेशाने शिक्षिका आहेत. आपल्या पतीच्या मृत्यूचा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत. काही काळ मुलगी संहिता सोबत असल्याने त्या ठीक होत्या. मात्र मुलगी देखील निघून गेल्याने त्या एकदम एकट्या पडल्या. त्यामुळे त्या उदास, शांत राहू लागल्या.


काय आहे हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्योरा डॉट कॉम' अनुभव शेअर करताना संहिताने हा प्रकार सविस्तर सांगितला. संहिताने सांगितले की, आईला एकटे सोडल्यावर तिला चक्कर येत असे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर असूनही मी वीकए़ंडला जयपूर जायचे. दोन दिवस माझ्या सोबत राहील्यावर ती खूश व्हायची. पण पुन्हा ती पुर्ववत होत असे. तिला एकटीला सोडून जाणे मलाही अवघड होत असे. दूर असतानाही मनात सारखी तिची चिंता असायची. मला मोठी बहीणही आहे. ती तिच्या संसारात असल्याने तिलाही फार काळ आईसोबत राहणे शक्य होत नसे. त्यामुळे आई एकटी असताना सतत वडीलांच्या आठवणीत दुःखी होत असे.


तिचे दुःख पाहुन घेतला निर्णय


तिचे दुःख पाहुन मी विचार केला की, वडीलांच्या आठवणीपासून दूर जाण्यासाठी आईने व्यस्त राहणे गरजेचे आहे. म्हणून मी एक निर्णय घेतला.


साथीदार असणे गरजेचे आहे


गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संहिताने ठरवले की, आईचे मन रमण्यासाठी एका साथीदारची गरज आहे. म्हणून तिने तिच्या ५३ वर्षीय आईचे प्रोफाईल मेट्रोमोनीयल साईटवर अपलोड केले. त्यात संहिताने स्वतः फोन नंबर दिला. मात्र जेव्हा हे गीता यांना कळले तेव्हा हे कसे शक्य आहे, असे त्यांना वाटले. याने समाज  आणि परिवार काय विचार करतील, अशी चिंता त्यांना वाटू लागली.


गीता म्हणाल्या...


संहिताची ही कल्पना काही माझ्या पचनी पडत नव्हती. त्यामुळे मी सतत चिंता, काळजी करू लागले. कारण ही कल्पना आपल्या रुढी-परंपरांविरूद्ध होती आणि या वयात हे कसे शक्य आहे, असे मला वाटत होते. मात्र संहिताने ही गोष्ट आमच्या परिवाला इतकी छान समजवली की, कोणीही विरोध नाही केला. त्याचबरोबर मला पुन्हा जीवन जगण्याची संधी दिल्याचा आनंद आणि समाधान संहिताला मिळाले.



आईच्या लग्नाचा घाट


ऑक्टोबरमध्ये ५५ वर्षीय केजी गुप्ता यांच्याशी संहिताचा संपर्क झाला. तिने त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. केजी गुप्ता हे राजस्व इंस्पेक्टर या पदावर कार्यरत होते. २०१० मध्ये कॅन्सरने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे ते ही एकटे होते. एकटेपणा दूर करण्यासाठी ते बॅटमिंटन खेळत पण कालांतराने शरीराने साथ देणे सोडले. गुप्ता यांना दोन मुलं आहेत.



आणि आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले....


संहिताने संपूर्ण चौकशी, विचारपूस करून ३१ डिसेंबरला या दोघांच्या लग्नाचा बार उडवला. यामुळे आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि तिच्या आनंदाने संहिता सुखावली.