वाढत्या महागाई, बेरोजगारीविरोधात डाव्या पक्षांची `भारत बंद`ची घोषणा
सरकारच्या निषेधार्थ देशभरात `भारत बंद` ची हाक देण्यात आली आहे.
कोलकाता : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, शेतकऱ्यांना केलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केलेल्या सरकारच्या निषेधार्थ देशभरात 'भारत बंद' ची हाक देण्यात आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी(माकपा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी)-लिबरेशन, आरएसपी आणि सोशलिस्ट यूनिटी सेंटर ऑफ इंडिया (एसयूसी) या डाव्या पक्षांच्या संघटना यामध्ये सहभागी असणार आहेत.
सरकारवर आरोप
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे प्रत्येक गोष्ट महाग होत असून कोट्यावधी भारतीयांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे.यापुढे आर्थिक मंदी निर्माण होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार नाहीत आणि जे रोजगार आहेत तेही निघून जातील असा आरोप या संघटनांनी केलायं. केंद्र सरकारने कोणालाचं पीकाचे योग्य मुल्य दिलं नाही, शेतकऱ्यांना त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाहीच याउलट कॉर्पोरेट कंपन्यांना 4 लाख कोटी रुपयांच कर्ज माफ करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
12 तास बंद
डाव्या संघटनांचे अध्यक्ष विमान बोस यांनी शुक्रवारी 10 सप्टेंबरला सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत 12 तास भारत बंदचे आवाहन केलंय. दैनंदिन वापराच्या वस्तू महाग होत असून सरकार कामगार वर्गाचा रोजगारच हिसकावून घेत असल्याचा आरोप पश्चिम बंगाल इकाईचे महासचिव सुर्यकांत मिश्रा यांनी केलायं.