मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील आर्थिक घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोने चांदीच्या दरांवर परिणाम होत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या लग्न सराईच्या हंगामात सोन्याच्या दागिन्यांना मागणी असते. अशा वेळी सोने महागल्याने ग्राहकांना जादा पैसे देऊन सोने खरेदी करावे लागणार आहे. तरी देखील सोने आपल्या उच्चांकी दरांपासून ग्राहकांना स्वस्तच मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 55 हजार रुपये प्रति तोळेच्या पुढे गेले होते. 


आज मल्टी कमोडिटी एक्सचेज (MCX)वर आज सोन्याचे भाव  47,911 रुपये प्रति तोळे होते. तर चांदीचे भाव 62,137 रुपये प्रति किलो इतके होते. सोने आणि चांदीच्या दरात कालच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली आहेय


राज्याची राजधानी मुंबईतही काल (12 जानेवारी) आणि आजही सोन्याच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील जळगाव, औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर आदी सराफा बाजारांमध्ये कमी - अधिक प्रमाणात हेच दर दिसून येत आहेत. जाणून घेऊ या मुंबईतील सोन्याचे दर..


मुंबईतील सोन्याचे दर
13 जानेवारी  48,640  रुपये प्रति तोळे
12 जानेवारी  48,630 रुपये प्रति तोळे
11 जानेवारी  48,340  रुपये प्रति तोळे
10 जानेवारी  48,350रुपये प्रति तोळे


मुंबईतील चांदीचे दर
13 जानेवारी 62,000 रुपये प्रति किलो
12 जानेवारी 65000 रुपये प्रति किलो
11 जानेवारी 60800 रुपये प्रति किलो
10 जानेवारी 60400 रुपये प्रति किलो


 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?


24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 


24 कॅरेट सोने आलिशान असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.