भाजपा सरकार माझी हत्या करेल- आ. जिग्नेश मेवाणी
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझी हत्या करेल अशी भिती वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझी हत्या करेल अशी भिती वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला त्याने नुकतीच मुलाखत दिले. यामध्ये भाजपा सरकारच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा निशाणा साधला.
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी आपला एन्काऊंटर करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जिग्नेश मेवाणने हे वक्तव्य केले आहे.
कुठे गायब झाले होते तोगडिया?
राजस्थान सरकारनं माझ्या एन्काऊंटरसाठी पोलिसांना पाठवलं होतं, अशी माहिती मला एका कार्यकर्त्याकडून समजली. मला सांगितलं गेलं की राजस्थान पोलिसांची टीम गुजरात पोलिसांसोबत मला पकडण्यासाठी येत आहे. त्यामुळे मी तिथून निघालो... माझ्याकडे तेव्हा काहीही नव्हतं... मी माझ्या 'झेडप्लस' सिक्युरिटीला सांगून निघालो होतो... ऑटो रिक्षा घेऊन एअरपोर्टकडे रवाना झालो... जयपूर जाऊन हायकोर्टाकडून वॉरंटविरुद्ध स्टे ऑर्डर घेऊ, असं मला वाटलं... लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून फोन बंद केले होते... यावेळी कुणीही ओळखू नये म्हणून मी शाल घेतली होती... त्यानंतर मी अचानक बेशुद्ध झालो... डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पीटलमध्ये होते... अशी कहाणी कथन करताना तोगडियांना अश्रू अनावर झाले होते.
'आवाज दाबण्याचा प्रयत्न'
मी आजवर हिंदू संघटनांच्या एकतेचं काम केलं आणि करत राहीन... माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं. हा प्रयत्न कोण करतंय? असा प्रतिप्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा 'मी पुराव्यांसहीत स्पष्ट करेन' असं त्यांनी म्हटलं.
गोवण्याचा प्रयत्न...
जुने खटले काढून मला गोवण्याचा प्रयत्न असून कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवल्याचे ते म्हणाले. माझ्या घराच्या झाडाझडतीचं वॉरंट का? मी अट्टल गुन्हेगार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मी कोणतंही कायद्याविरुद्ध काम केलेलं नाही... आम्ही हिंदुत्व मागे टाकावं म्हणून याच नाही तर इतरही राज्यांत जुने खटले काढून आपल्याला गोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, असंही तोगडियांनी पत्रकार परिषदेत म्हटल.