नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांचं मनोधैर्याचा जेवढा गर्व करावा, तेवढा कमी आहे, कारण काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी स्थानिक मुलांची माथी भडकवली आहेत, त्यातही जवानांना अतिशय विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतोय. या जवानांवर कोणत्याही प्रकारे वार करण्याचा प्रयत्न येथील वाट भरकटलेले तरूण सोडताना दिसत नाहीत. या माथेफिरूंच्या तावडीतून सुटल्यानंतर सीआरपीएफ जवानांची एखाद्या आरोपीसारखी चौकशी येथील पोलीस करत आहेत, देशाचं संरक्षण करणाऱ्या सीआरपीएफ जवानांना पोलिसांच्या प्रश्नांचा सामना करावा लागतोय. हेच जम्मू काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफ जवानांच्या जीवनाचं सत्य आहे.


सीआरपीएफ जवानांचीच उलट चौकशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही नुकतीच बानगी येथे घडली, श्रीनगरपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या नोहट्टा शहरात घडली. या धोकादायक घटनेत दगडफेक करणाऱ्या जमावाने जिप्सीतील सीआरपीएफच्या सहा कमांडोंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या जीवघेण्या हल्ल्यात जम्मू काश्मीर पोलिसांनी काहीही कारवाई तर केलीच नाही. पण जीव वाचवून आलेल्या या सीआरपीएफ जवानांवर वेगवेगळ्या कलमांसह एफआयआर दाखल करण्यात आली. 


सीआरपीएफ जवानांवर गंभीर गुन्हे


या एफआयआरमध्ये सीआरपीएफ जवानांवर हत्येचा प्रयत्न, कलम ३०७ आणि 148 दंगल आणि घातक हत्यारं तसेच 279 म्हणजे गर्दीत वाहन चालवणे, असे गुन्हे दाखल केले आहेत.
याशिवाय सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवर 149, 152, 336 आणि 427 नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला. 


एफआयआरच्या संदर्भात गुरूवारी नोहट्टा पोलिस स्टेशनच्या सीआरपीएफ कमांडोज, जिप्सीचे ड्रायव्हर आणि इतर ४ जवानांची खूप वेळ चौकळी करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची ही पहिली चौकशी होती, आता सीआरपीएफ जवान जे आपला जीव संकटातून वाचवून आले आहेत, त्यांच्या जम्मू काश्मीर पोलीस कशा प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती करतात.