Mens underwear index For Economy : आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत उत्पादन (GDP) वाढीचा दर 4.4 टक्क्यांवर आला आहे. 2021-22 च्या याच तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 11.2 टक्के दराने वाढली होती. चालू आर्थिक वर्षात मात्र जीडीपीमध्ये मोठी घसरण झाली आहे. याबाबत अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीमुळे अर्थतज्ञांची झोप उडाली आहेत. दुसकीकडे पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीवरुन लावला जातो देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जात आहे. अंडरवेअर विक्रीत झालेली घट देखील आर्थिक चिंतेची बाब ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत भारतात पुरुषांच्या अंडरवेअरच्या विक्रीत प्रचंड घट झाली आहे. अंडरवेअर विक्रीवरुन देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातोय. अमेरिकेच्या फेडरल रिजर्वचे माजी प्रमुख ऐलन ग्रीनस्‍पैन (Alan Greenspan) यांनी  मेन्स अंडरवियर इंडेक्‍स (Men’s underwear index) प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी नेमका काय संबध आहे याबाबत अनेक तर्क मांडले आहेत. 


जेव्हा एखाद्या देशात पुरुषांच्या अंडरवेअरची विक्री कमी होते, तेव्हा ते मंदीचे लक्षण आहे. असा संकेत आहे. 2007 ते 2009 दरम्यान अमेरिकेत आर्थिक मंदी सुरू होण्यापूर्वी अंडरवियरच्या विक्रीत घट झाली होती असा दावा या अंडरवेअर इंडेक्समध्ये करण्यात आला आहे.


1970 च्या दशकात देखील ग्रीनस्‍पैनमध्ये देखील या इंडेक्सनुसार अर्थव्यस्थेचा अंदाज बांधण्यात आला होता. पुरुषांच्या अंडरवियरच्या विक्रीचा आकडा हा एक महत्त्वाचा आर्थिक सूचक मानले जाते. अंडरवेअर हे पुरुषांचे अत्यंत खाजगी वस्त्र आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यास पुरुष अंडरवेअर खरेदी करत नाहीत.  पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीवरुन देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातो. 


भारतात पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट


भारतात डिसेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत पुरुषांच्या अंडरवेअरच्या विक्रीत 55 टक्क्यांपर्यंत घट झाली होती. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या दोन तिमाहीत  महागाईचा आलेख वाढलेला असताना अंडरवेअर विक्रिचा व्यवसाय तेजीत होता. डिसेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत जॉकी (Jockey), लक्स इंडस्ट्रीज (Lux Industries), पेज इंडस्ट्रीज (Page Industries), रूपा (Rupa) या अंडरवेअर कंपन्यांच्या व्यवसायात घट झाली आहे. तसेच या कंपन्यांचे शेअरर्समध्ये देखील पडझड पहायला मिळाली. 


पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी नेमका काय संबध?


अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीवरुन लावला पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबध जोडला जातो. 2007 ते 2009 या काळात अमेरिकेत मोठी आर्थिक मंदी आली होती. सुपरपावर असलेल्या अमेरिकीची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यावेळी आर्थिक मंदीचा सखोल अभ्यास करण्यात आला. यावेळी  मेन्स अंडरवियर इंडेक्‍सचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेत आर्थिक मंदी असतानाच म्हणजे सन 2007 ते 2009 या कालावधीत पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत लक्षणीय घट झाली. 2010 मध्ये अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारताच पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत पुन्हा तेजी आली.