प्रयागराज : भारतात जवळपास रोजच विविध ठिकाणी अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देवदेवतांच्या यात्रा, पालख्या या गोष्टी आपल्यासाठी नव्या नाहीत. ज्या मेळ्याची भक्तगण आवर्जून वाट पाहतात तो म्हणजे कुंभमेळा. यावेळेस कुंभमेळ्याचे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले आहे. कुंभमेळ्याला देशभरातील लाखो भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयारी केली आहे. कुंभमेळ्यासाठी आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून लक्ष दिले जाते आहे. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने पंचतारांकित हॉटेल प्रमाणेच सोय केली आहे. ज्या प्रकारे गुजरातमधील कच्छ येथे होणाऱ्या रणोत्सवासाठी पर्यटकांची तंबूमध्ये राहण्याची सोय केली जाते. त्या प्रमाणेच प्रयागराज येथे तंबूची सोय करण्यात आली आहे.
 
प्रशासनाकडून भक्तांसाठी ४ हजार तंबूंची सोय करण्यात आली आहे. हे तंबू पंचतारांकित हॉटेलप्रमाणेच आहेत. ज्या सुविधा आपल्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळतात. त्याच सुविधा या तंबूत मिळणार आहेत. अशी माहिती आयुक्त आशिष गोयल यांनी दिली. हे तंबू भक्तगण ऑनलाईन बूक करु शकतात. https://kumbh.gov.in/ . प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची वेबसाईट आहे. भक्तगणांना आवश्यक माहिती, मार्गदर्शनसाठी या वेबसाईटचा फायदा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



कुंभमेळ्याचे महत्त्व


जगातील सर्वात मोठ्या कुंभयात्रेचे आयोजन हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन येथे करण्यात येते. या शहरांमध्ये दर १२ वर्षांनी ज्योतिषीय योग जुळून आल्यास कुंभमेळ्याचा आयोजन केले जाते. पुरांणानुसार देवासुर संग्रामादरम्यान या ४ शहारात अमृताचे थेंब पडले होते. सहा वर्षांत होणाऱ्या कुंभ आणि १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभचं प्रमुख आकर्षण हे साधू-संतांचे १३ आखाडे असतात.


या कुंभमेळ्यातील शाहीस्नानाला विशेष महत्व असते. अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या माहितीनुसार यंदाच्या मेळ्यात या दिवशी शाही स्नान होणार आहेत. पहिले शाही स्नान मंकरसक्रांतीला म्हणजेच मंगळवार, १५ जानेवारी २०१९ ला होणार आहे. तर दुसरे शाही स्नान मौनी अमावस्येला, ४ फेब्रुवारीला होणार आहे. तिसरे शाही स्नान वसंत पंचमीला, म्हणजेच १० फेब्रुवारी २०१९ ला होणार आहे.