Apple Airpod Story: बंगळुरू देशातलं टेक हब म्हणून ओळखलं जातं. मोठंमोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्या या भागात आहेत. त्यामुळे या भागात टेक्निकल वस्तू वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पण या भागातील रिक्षा ड्रायव्हरही टेक्नोसॅव्ही झाले आहेत, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच विश्वास बसेल. एका ऑटोरिक्षा ड्रायव्हरने तंत्रज्ञानाचा उपयोग करत अर्ध्या तासाच्या आत एक महिलेला एअरपॉड दिले. हा अनुभव महिलेने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. इतकंच काय तर ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा पाहून डोळे भरून आले. शिदिका नावाची महिला ऑटोमध्ये अॅप्पलचा एअरपॉड विसरली होती. मात्र ऑफिसच्या सिक्युरिटीचा कॉल आला आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिला तिचा हरवलेला एअरपॉड मिळाला होता. 


महिलेने ट्विटरवर शेअर केला अनुभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिदीकाने ट्विटरवर अनुभव शेअर केला आहे. ट्वीट करत लिहिलं आहे की, 'ऑटोमध्ये प्रवास करताना माझे एअरपॉड हरवले. अर्ध्या तासानंतर  ऑटो ड्रायव्हर ज्याने मला WeWork येथे सोडले होते तो एंट्री गेटवर आला आणि एअरपॉड परत सुरक्षेकडे सोपवले. त्याने Airpods च्या मालकाचे नाव शोधण्यासाठी फोनशी कनेक्ट केले आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा PhonePe ट्रांजेक्शन वापरलं." त्यानंतर त्या महिलेनं आणखी एक ट्वीट केलं भावनिक होत रडण्याची इमोजी टाकली आहे. या पोस्टनंतर युजर्स ड्रायव्हरच्या टेक्निकल नॉलेजमुळे इंप्रेस झाले आहेत. 



बातमी वाचा: Tesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral


 पोस्टखाली युजर्संनी नोंदवलं आपलं मत


आतापर्यंत तिने केलेलं ट्वीट 10 हजाराहून अधिक लोकांनी लाइक आणि 500 हून अधिक लोकांनी रीट्वीट केलं आहे. युजर्स ऑटोचालकाच्या टेक्निकल नॉलेजमुळे प्रभावित झाले आहेत. पोस्टखाली युजर्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "ऑटो ड्रायव्हर खरंच खूप स्मार्ट आहे. ऑटो ड्रायव्ह टेक फ्रेंडली वाटतो की इंजिनियर आहे?" दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "कधी कधी असं वाटतं बंगळुरूचे ऑटो ड्रायव्हर आमच्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आणखी प्रबळ आहेत."