नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानकडून सतत सुरु असलेल्या फायरिंगनंतर एलओसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जवानांना अलर्ट राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कश्मीरच्या बांदीपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात दहशवताद्यांनविरोधात बुधवारी सर्च ऑपरेशन सुरु होतं. दहशवताद्यांना शोधण्यासाठी विशेष पॅरा कमांडोंची मदत घेतली गेली. लष्कराद्वारे बांदीपोरा जिल्हात गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरु आहे.


गुरेज सेक्टरमध्ये कंजलवान भागात एलओसीच्या सीमाभागात मंगळवारी सकाळी ५ वाजता ५ ते ६ दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. या दरम्यान तेथे तैनात सेनेच्या 36 राष्ट्रीय रायफल्सच्या सतर्कतेमुळे जवानांनी एलओसीवर संशयास्पद हरकत पाहताच दहशतवाद्यांना आव्हान दिलं. त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला.


दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी उत्तर देत २ दहशतवाद्यांना ठआर केलं. दहशतवाद्यांकडून 3 एके रायफल जप्त केल्या गेल्या. इतर दहशवताद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.