देशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद
देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.
नवी दिल्ली : देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.
भारतात स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्वात जास्त एटीएम आहेत. जूनमध्ये देशभरातील एसबीआयच्या एटीएमची संख्या 59,291 होती, ऑगस्टमध्ये ती घटून आता 59,200 झाली आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमची संख्या 10,502 वरुन 10,083 झाली आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या एटीएमची संख्या 12,230 वरून 12,225 वर आली आहे.
बँकांचं म्हणणं आहे की 7x5 चौरस फूट एटीएम कॅबिन विमानतळ आणि मुंबईमधील महत्त्वाच्या जागेचं भाडं 40,000 पर्यंत जाऊ शकतं. चेन्नई आणि बंगळूरुसारख्या महानगरांमध्ये देखील एटीएमच्या जागेचे भाडे 8 हजार ते 15 हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एटीएम ऑपरेटर, देखभाल शुल्क आणि वीज बिल समाविष्ट करून एटीएम कॅबिनच्या देखभालचा खर्च प्रति महिना 1 लाखापर्यंत जाते. विशेषत: एटीएमच्या केबिनमध्ये विजेचं बील खूप जास्त येतं. कारण यामध्ये तापमानाचा दर 15 ते 18 अंश सेल्सिअस ठेवावा लागतो.
एसबीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, काही सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाच्या नंतर आम्ही काही एटीएम बंद केले आहेत. आम्हाला हा निर्णय घ्यायचा होता की, एटीएमवर येणाऱ्या खर्चानुसार त्याचा वापर देखील तेवढा आहे का?. आम्ही असे सर्व एटीएम बंद केले आहेत, ज्याभोवती एसबीआयचे 500 मीटरच्या अंतरामध्ये दुसरं एटीएम आहे. हे आमच्या ग्राहकांसाठी खूप असामान्य होणार नाही. ' काही अन्य बँकांनी त्यांचे एटीएम बंद नाही केले पण वाढवण्याची देखील त्यांची काही योजना नाही.'