नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. प्रणव मुखर्जी यांची राजकीय बुद्धीमत्ता आणि वागणं यामुळे सर्वजण प्रभावित झाले. हेच कारण आहे जेव्हा प्रणव मुखर्जी यांनी प्रथम राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांची बहीण अन्नपूर्णा यांनी ते राष्ट्रपती होतील अशी भविष्यवाणी केली. जी नंतर सत्यात उतरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, 'एकदा जेव्हा ते तरुण खासदार होते तेव्हा प्रेसिडेंट हाऊस पाहताना त्यांनी आपल्या बहिणीला सांगितले होते की, पुढच्या आयुष्यात आपण शाही घोडा म्हणून जन्माला यावे, जेणेकरून त्यांना राष्ट्रपती भवनपर्यंत पोहोचता येईल. यावर त्यांची बहीण म्हणाली होती की, तुम्ही राष्ट्रपतींचा घोडा का व्हावं, तुम्ही याच जीवनात राष्ट्रपती व्हाल.'


मुखर्जी म्हणाले होते की, दिल्लीत आपल्या शासकीय निवासस्थानाच्या व्हरांड्यात चहाच्या दरम्यान चर्चा सुरु असताना त्यांची मोठी बहिण अन्नपूर्णा म्हणाल्या होत्या की, ते याच जन्मी राष्ट्रापती होतील. अन्नपूर्णा म्हणाल्या होत्या की, राष्ट्रपती भवन मुखर्जी यांच्या निवासस्थानापासून फारसे दूर नव्हते. त्यांच्या घरातून घोड्यांना नेतांना आणि त्यांची काळजी घेताना पाहता येत होते.'


प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, जेव्हा मी मरेल तेव्हा पुढच्या आयुष्यात मी राष्ट्रपतींचा घोडा होऊ इच्छितो. यानंतर त्यांची बहिण अन्नपूर्णा लगेच म्हणाल्या की, तुम्ही राष्ट्रपतींचा घोडा का व्हावं, तुम्ही या जीवनात राष्ट्रपती व्हाल.'