मुंबई : शेअर बाजारात तेजी कायम आहे. सेन्सेक्स ५० हजारांपासून अवघा २५० अंक दूर आहे. निफ्टी, सेन्सेक्स, बॅंक निफ्टी, निफ्टी मिड कॅप,  सगळे निर्देशांक सर्वोच्च स्तरावर दिसत आहेत. ऑटो, बॅंकिंग, आयटी, ऑईल, गॅस, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात जोरदार खरेदी झाली आहे.


शेअर बाजारात आलेल्या तेजीचं उत्तम उदाहरण म्हणजे बॅंक निफ्टी. बॅंकांच्या कंपन्यांचा निर्देशांक बॅंक निफ्टी एप्रिल महिन्यात १६००० हजारांवर घसरला होता. आज जवळपास २६२ दिवसांनी तो ३२ हजार ६५० म्हणजे दुप्पट झाला आहे.