टेक दिग्गज गुगलने 2007 मध्ये Google Street View लाँच केले होते. प्रत्यक्षरित्या एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी किंवा गेलेल्या ठिकाणांच्या आठवणींना उजाळा देण्यास या सुविधेमुळे मदत झाली आहे. या सुविधेचा मागील 15 वर्षांमध्ये लाखो युजर्संनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे गुगल स्ट्रीट व्ह्यूवर सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांमध्ये दुबईतील बुर्ज खलिफाचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सचा आयफेल टॉवर आणि तिसऱ्या क्रमांकावर भारतातील ताजमहाल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल स्ट्रीट व्ह्यूवर प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीत ताजमहालचा समावेश आहे. 2015 मध्ये जारी करण्यात आलेल्या तत्सम यादीतही ताजमहालचा समावेश होता. पहिल्या दहा पर्यटन स्थळांच्या यादीत ताजमहालचा समावेश होता.


ताजमहाल हे जगातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक असल्याने वर्षाला 7 ते 8 दशलक्षहून अधिक पाहुणे भेट देतात. यात 0.8 दशलक्षाहून अधिक परदेशी पाहुण्यांचा समावेश आहे. 1632 मध्ये मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला बांधला होता.


गुगल स्ट्रीट व्ह्यू प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक भेट दिलेल्या शहरांच्या यादी देखील देण्यात आली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे गुगल स्ट्रीट व्ह्यूवर सर्वाधिक शोधले गेलेले शहर आहे. हे शहर कोमोडो ड्रॅगनसाठी ओळखले जात असल्याने जगभरातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे.


देशाच्या दृष्टीने इंडोनेशिया हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक भेट दिलेला देश आहे. त्यानंतर युनायटेड स्टेट्स दुसऱ्या, जापान तिसऱ्या, मेक्सिको चौथ्या, ब्राझील पाचव्या आणि स्पेन सहाव्या स्थानावर आहे.