नवी दिल्ली | जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल. दिल्लीत गेल्यावर प्रत्येक जण आवर्जून ताजमहालला भेट देतोच. प्रेमाचं प्रतिक असल्याने, भेट देण्याऱ्यांमध्ये प्रेमीयुगुल आणि नवविवाहीत जोडप्यांच प्रमाण जास्त असतं. तुम्ही जर दिल्लीला जाऊन ताजमहालला भेट द्यायच ठरवत असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील. आजपासून म्हणजेच 10 डिसेंबरपासून ताजमहालच्या तिकीट दरात तब्बल पाचपट वाढ करण्यात आली आहे. आता ताजमहाल पाहण्यासाठी 50 ऐवजी 250 रुपये मोजावे लागणार आहे. तर विदेशी पर्यटकांना 1300 रुपये मोजावे लागणार आहे. तुम्हाला 50 रुपयाचं तिकीट सुद्धा काढता येईल, पण त्या तिकीटात तुम्हाला फक्त ठरावीक भागातच फिरता येईल. संपूर्ण ताजमहालच्या भागात फिरण्यासाठी 250 रुपयाचं तिकीट काढावं लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय पुरात्तव विभागाच्या सर्वेक्षणानुसार वाढत्या गर्दीवर अंकुश लावण्यासाठी नवी तिकीटप्रणाली लागू केली जात आहे. आतापर्यंत भारतीयांना 50 रुपयात तर विदेशी नागरिकांना 1100 रुपयात ताजमहाल दर्शन करता येत होतं. पण आता भारतीय नागरिकांना 250 रुपये तर विदेशी नागरिकांना 1300 रुपये प्रतिमाणशी मोजावे लागतील. 200 रुपयांच शुल्क फक्त मुमताज-शाहजहान यांच्या कबरीपर्यंत जाण्यासाठी आहे. सुधारित तिकीटदर आजपासून लागू करण्यात आले आहेत. 50 रुपयांच्या तिकीटामध्ये चमेलीच्या टाईल्स पासून (ताऱ्यांच्या आकाराची टाईल्स) ते वरच्या मार्बल प्लॅटफॉर्म पर्यंतच जाऊ शकता. शाहजहान-मुमताज ची कबर पाहण्यासाठी गुंबदच्या आत जाण्यासाठी गेटवरच बेरिअर लावला जाणार. तिथे तिकीटाची तपासणी केली जाईल.


पर्यटकांची संख्या घटणार


ताजमहाल पाहण्यासाठी दररोज 40 हजार पर्यटक येतात. हाच आकडा आठवड्याच्या शेवटच्या दिवसात 60 ते 70 हजाराच्या घरात असतो. वाढलेल्या तिकीटदरांमुळे पर्यटकांच्या संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. सध्याच्या नियमांनुसार, ताजमहाल पाहण्याऱ्या पर्यटकांचा आकडा नक्की नाही. सोबतच एकदा ताजमहाल मध्ये प्रवेश केल्यानंतर पर्यटक किती वेळही आत थांबू शकतात. पर्यटकांना आत सोडण्याच्या वेळा निर्धारीत करण्याबाबत नियमांबाबत चर्चा केली. यानुसार पर्यटकांसाठी 3 तासाचं नियम करण्यास सांगितलं आहे.