नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेची ताकद आता आणखी वाढली आहे. कारण आज फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर पाचही राफेल लढाऊ विमानं भारतात दाखल झाले आहेत. बुधवारी हरियाणाच्या अम्बाला एअरबेसवर ही राफेल विमानं सुरक्षित पोहोचली. तेथे त्यांचे वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया देखील उपस्थित होते. फ्रान्सकडून पहिल्या ५ राफेल विमानं भारताला देण्यात आली आहे. बाकीचे विमानं पुढच्या वर्षात दाखल होतील. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही राफेल विमाने मंगळवारी फ्रान्सहून रवाना झाली, त्यानंतर ते युएईमध्ये थांबले आणि बुधवारी दुपारी अंबाला येथे पोहोचले आहेत.



संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून हवाई दलाचे अभिनंदन केले. राजनाथ सिंह म्हणाले की, राफेलचं ताफ्यात येणं हे हवाई दलाच्या इतिहासातील क्रांतिकारक बदल असेल आणि भारतावर नजर टाकण्याआधी शत्रू अनेक वेळा विचार करेल. राफेल विमानांचा अजून हवाई दलात अधिकृतपणे समावेश करण्यात आलेला नाही. इंडक्शनसाठी एक वेगळा सोहळा आयोजित केला जाईल.