Relationship and Situationship : सध्या सोशल मिडियावर रिलेशनशिप आणि सिचुएशनशिप हे दोन शब्द चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत. या दोन शब्दांचा वेगवेगळा अर्थ सांगणारे अनेक गमतीशीर व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र, सध्या आपण गंमत म्हणून चर्चा करत असलेले रिलेशनशिप आणि सिचुएशनशिप या दोन शब्दांचा नेमका अर्थ गांभिरतेने शोधण्याची गरज आली आहे. एका सर्व्हेत भारतात ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिपचा ट्रेंड वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा विवाहितांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग ॲप ग्लीडन नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेत भारतातील विवाहित लोकांबद्दलच्या विवाहबाह्य संबध तसेच नात्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील अनेक विवाहीत हे विवाहबाह्य संबधांकडे आकर्षित होत आहेत. यात पुरुष आणि महिला दोघांचा समावेश आहे. यासाठी अनेक विवाहीत विविध डेटिंग App ची मदत घेत आहेत. 


ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिप 


सर्व्हेनुसार अनेक विवाहीत आपल्या जोडीदाराला धोका आहेत. विवाह, विवाहबाह्य संबध तसेच जोडीदारासोबतचा प्रामाणिकपणा या तीन प्रमुख मुद्द्यावंर हा सर्व्हे करण्यात आला. भारतात विवाहबाह्य संबध हे एक प्रकारचा अपराध मानला जातो. भारतात पारंपारिक पद्धतीने लग्न करताना सप्तपदी घेतली जाते. एकमेकांना वचनं दिली जातात. भारतात लग्न म्हणजे कमिटेड रिलेशनशीप असते. मात्र, आता अनेक भारतीय विवाहित असताना ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिप या पर्यायांचा मार्ग निवडत असल्याची धक्कादायक माहिती या सव्हेक्षमातून समोर आली आहे. 25 ते 50 वयोगटातील विवाहितांना या सर्व्हेक्षणात सहभागी करुन घेण्यात आले. वेगवेगळ्या वयोगटानुसार भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे सारख्या मेट्रो सिटीमधील हजारो विवाहीतांचे मत या सर्व्हेक्षणात जाणून घेण्यात आले. 


विवाह्यसंबध ठेवण्यामागे धक्कादायक कारणे


भारतात 60 टक्क्यांपेक्षा जास्त विवाहीत विवाहबाह्य संबध ठेवत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. ऑनलाईन डेटिंग तसेच विविध माध्यमांच्या मदतीने विवाहबाह्य संबध प्रस्थापित केले जात आहेत. विवाह्यसंबध ठेवण्यामागे धक्कादायक कारणे समोर आली आहेत.   विवाह्यसंबध ठेवण्यामागे फक्त शारिरीक आकर्षणच नसते तर अनेकजण भावनिक आधार शोधण्यासाठी विवाहबाह्यय संबध ठेवतात. तर, अनेकजण आपल्या जोडीदाराव्यतीरीक्त दुसऱ्यांसोबत राहण्याची स्वप्न पाहतात. सध्याच्या डिजीटल युगात अनेकजण फक्त ऑनलाईन फ्लर्ट करतात. 36 टक्के महिला तर 35 टक्के पुरुष ऑलाईन फ्लर्ट करण्याचा आनंद घेतात अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. विवाह्यसंबधांमध्ये भारतात  ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिपचा ट्रेंड वाढत असल्याची धक्कादायक माहिती देखील या सर्व्हेक्षणातून समोर आलेय.