नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढते आहे. दररोज कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या मोठी चिंतेची बाब ठरत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात संशोधनही सुरु आहे. आता भारत बायोटेकने कोरोनावरील लस तयार केली असून याची क्लिनिकल ट्रायल होणार असल्याची चर्चा आहे. याच्या मानवी चाचणीसाठीही परवानगी देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. मात्र या चर्चेदरम्यान सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


१५ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतात, आयसीएमआरला विश्वास


 


या फोटोमधून, मानवी चाचणी केल्याचा, लसीचा पहिला डोस बीबीआयएलचे उपाध्यक्ष व्ही.के. श्रीनिवास यांना दिल्याचा दावा केला जात आहे. भारत बायोटेकच्या नावाने सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याबाबतची एक माहिती आता समोर आली आहे. 


फोटो सौजन्य : फेसबुक

भारत बायोटेकने फोटोमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचं म्हणत तो फेटाळून लावला आहे. भारत बायोटेकने अधिकृत ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये, अद्याप अशाप्रकारची कोणतीही चाचणी करण्यात आली नसल्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय व्हायरल होत असलेला फोटो रक्त घेतानाचा असून अशा प्रकारचा फोटो, मेसेज भारत बायोटेकने प्रसारित केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.