नवी दिल्ली : पेगॅसिस प्रकरणी नवी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशातील सर्व विरोधी पक्ष आज एकत्र उभे आहेत. कारण आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा एकच प्रश्न आहे की,  भारत सरकारने पेगॅसेस खरेदी केले का? विरोधक आणि आपल्या लोकांच्याविरोधात याचा वापर झाला का?' असा सवाल कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला. 


पेगॅसेसच्या मुद्यावर सरकार संसदेत चर्चा करीत नाही. पेगॅसेस देशाच्या विरोधात वापरले गेले. देशाच्या लोकशाहीच्या विरोधात या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.


पेगॅसेस आमच्यासाठी राष्ट्रीय विषय आहे. हा फक्त गोपनियतेचा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रविरोधी कृत्य केले. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.