दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of the Legislature) ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईतच होण्याची शक्यता आहे. ७,८ आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस अधिवेशन होण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली गेल्याने अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार होता. पण रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार अधिवेशन होण्याची शक्यता आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशन होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होती.



राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा ही जनतेमध्ये सुरु झाली आहे.


देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची नवी लाट आल्याने काही ठिकाणी रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे येणारे काही दिवस महत्त्वाचे आहेत.