Class 12 student climbed the highest 7 peaks: जर मनात चिकाटी आणि काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द असेल तर वाटेतील कोणत्याच अडचणी आपल्याला अडवू शकत नाहीत. बारावीत शिकणाऱ्या मुलीने हे सिद्ध केलं असून, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षात सात खंडांच्या सात सर्वाधिक उंच शिखरे सर करणारी जगातील सर्वात लहान मुलगी ठरली. या मुलीचे नाव काम्या कार्तिकेयन असून मुंबईतील नेवी चिल्ड्रन स्कूलची ती विद्यार्थीनी आहे. इतक्या कमी वयात सात उच्च शिखरे सर करुन तिने इतिहास रचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 17 व्या वर्षी मुलीने आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो, युरोपमधील माउंट एल्ब्रस, ऑस्ट्रेलियातील माउंट कोसियस्जगो, दक्षिण अमेरिकेतील माउंट अॅकॉनकागुआ, उत्तर अमेरिकेतील माउंट डेनाली, आशियातील माउंट एवरेस्ट आणि नुकतंच अंटार्टिकेतील माउंट विसेंट शिखर सर करुन अद्वितीय यश संपादन केले आहे. 


हे ही वाचा: अभिमानास्पद! चीनच्या सीमेलगत 'भगवा' फडकला, लडाखमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण


 


भारतीय नौसेनाने या मुलीचा उल्लेख 'युवा एव्हरेस्टर' असा केला आहे. काम्या आपले वडील एस. कार्तिकेयन यांच्यासोबत 24 डिसेंबरला चिली मानक वेळानुसार 5 वाजून 20 मिनिटांनी अंटार्कटिकेतील माउंट विसेंट शिखरावर पोहोचली. हे सातवे शिखर पार करण्यात काम्या कार्तिकेयनला यश मिळाल्यानंतर भारतीय नौसेना दलाने तिचे आणि तिच्या वडिलांचे अभिनंदन केले. 


जेव्हा काम्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केला होता तेव्हा ती 16 वर्षांची होती. तसंच वयाच्या सातव्या वर्षी तिने उत्तराखंडमध्ये तिचा पहिला ट्रेक केल्याची माहिती एक्स हँडलवरुन देण्यात आली आहे. 


आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन नौदलाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे की, 'काम्या ही कमी वयात सात खंडांचे सर्वोच्च सात शिखर सर करणारी पहिली महिला ठरली आहे. काम्याने जगातील सात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकवून एक अनोखा इतिहास रचला आहे'.