``देवा मला माफ कर``, म्हणत चोरानं मंदिरावरच मारला डल्ला, पाहा VIDEO
मध्य प्रदेश जिल्ह्यातील परिहार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पनीहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर (Jain Temple) आहे. या जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने हात जोडून देवाचा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर 6 अष्टधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला.
देशभरात दररोज चोरीच्या (Robbery) घटना घडत असतात. मात्र अशा घटना क्वचितच घडतात. कारण या घटनेत चोरी करण्याआधी चोरट्याने देवाच्या पाया पडल्या आहेत, आणि मग नंतर त्याने मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. ही चोरीची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कैद (CCTV Footage) झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.
व्हिडिओत काय?
एका प्रसिद्ध जैन मंदिरात (Jain Temple) चोरीची ही घटना घडलीय. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, चोरी करण्यासाठी चोर आधी मंदिरात शिरला, त्याने देवासमोर हात जोडून प्रार्थना केली. आणि नंतर मंदिरातील दानपेटीवर आणि मुर्त्या घेऊन त्याने पळ काढला. ही सपुर्ण घटना मंदिराच्या सीसीटीव्हीत कैद (CCTV Footage) झाली आहे. या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ (theft video) आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : लिफ्टमध्ये अडकला 8 वर्षाचा मुलगा, 10 मिनिट झाली तरी कोणीही...पाहा VIDEO
घटनाक्रम काय?
मध्य प्रदेश जिल्ह्यातील परिहार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पनीहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर (Jain Temple) आहे. या जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने हात जोडून देवाचा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर 6 अष्टधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) कैद झाली आहे. काल रात्री एका चोरट्याने ही चोरी घ़डवून आणली.
हे ही वाचा : वृध्द व्यक्तीचा भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट,पाहा VIDEO
आज सकाळी पुजारी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले असता दानपेटीचे कुलूप तुटलेले आढळून आले. यासोबतच मूर्तीही गायब असल्याचे आढळून आले. यावेळी मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज (CCTV Footage) तपासले असता चोरी झाल्याची माहिती मिळाली.
दरम्यान या घटनेची माहिती पुजाऱ्यांनी परिहार पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) ताब्यात घेऊन चोरट्याचा शोध सुरू केला. लवकरच चोर पकडला जाईल, असा पोलिसांचा दावा आहे.