India Alliance : देशता मोठा राजकी. भूकंप पहायला मिळत आहे. भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडी उभी फूट पडल्याचे दिसत आहे.  पश्चिम बंगाल पाठोपाठ पंजाबमध्येही इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सर्वच्या सर्व जागा लढेल असं जहीर केले. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. या जागांवर आम आदमी पार्टी कुणाशीही युती करणार नाही असं भगवंत मान यांनी स्पष्ट केलंय. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार असली तरी दिल्लीत मात्र इंडिया आघाडीसोबतच लढणार असंही आपने जाहीर केलय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधून स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. भाजपला पराभूत करण्यासाठी आपला पक्ष पुरेसा आहे असं ममता बॅनर्जींनी म्हंटलंय. राहुल गांधींच्या न्याय यात्रेबाबत आपल्याला माहितीही देण्यात आलेली नाही असंही ममता बॅनर्जींनी म्हंटलंय. मात्र आपण इंडिया आघाडीचा भाग आहोत असंही ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलंय. ममता बॅनर्जींच्या या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतील फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या आधारस्तंभ आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिलीय. 


एकीकडे ममता बॅनर्जींनी पं.बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या कुचबिहारमधून राहुल गांधींच्या न्याय यात्रेचे पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी ममता बॅनर्जींच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीपूर्वी राहुल गांधींच्या न्याय यात्रेचे पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. राहुल गांधींची न्याय यात्रा पश्चिम बंगालच्या बेहरामपूरमधून जाणार आहे. मात्र त्यांच्या यात्रेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 


आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया


ममता बॅनर्जी या लढवय्या आहेत त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मी अधिक माहिती घेऊन बोलेन असं सांगत आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचा इंडिया आघाडीत निवडणूक न लढवण्याच्या निर्णया बाबत असते कदम ची भूमिका घेतली.. ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्रपणे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे इंडिया आघाडीत राहून स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडण्याच्या या निर्णयामुळे इंडिया गाडीतल्या सदस्यांची अडचण निर्माण झाली आहे