मुंबई : Aadhaar Update: आजच्या काळात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मोबाइल सिमपासून बँक खात्यापर्यंत आधार लिंक खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या स्वतःच्या बँकेत आधार लिंक आहे की नाही हे तुम्हाला कळेल, पण तुमच्या आधारशी किती बँक खाती लिंक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच तुमच्या आधार कार्डशी किती बँक खाती लिंक आहेत हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार वापरकर्त्यांनी वेळोवेळी तपासत रहावे की असे कोणतेही खाते तुमच्या आधारशी जोडलेले आहे की नाही, ज्याची तुम्हाला माहिती नाही. कोणत्याही प्रकारची बँक फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.


बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक 


बँकेच्या नियमांनुसार, जर तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तर अशा परिस्थितीत तुमचे खाते गोठवले जाते. त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करु शकणार नाही. अशा परिस्थितीत, तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असली तरी, तुमची सर्व बँक खाती आधारशी लिंक आहेत की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.


यूजर एकापेक्षा जास्त बँक खाती एका आधारशी लिंक करु शकतात. तुम्हाला तुमच्या कोणत्याही बँक खात्याच्या आर्थिक व्यवहारात कोणताही अडथळा नको असेल आणि तुमच्या आधारशी कोणतीही अज्ञात बँक लिंक झाली असेल, तर तुमच्या आधार कार्डशी किती बँक खाती लिंक आहेत हे वेळोवेळी तपासा.


कसे तपासायचे आधारशी लिंक बँक खाते?


सर्व प्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जावे लागेल.
मुख्य पृष्ठावर आल्यानंतर, तुम्हाला MY आधारच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला आधार सेवेकडे जावे लागेल.
आता तुम्हाला Check Aadhaar/Bank Linking च्या पर्यायावर जावे लागेल.
Check Aadhaar/Bank Linking क्लिक केल्यावर, एक नवीन पेज उघडेल.
तुम्ही नवीन पेजवर येताच तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा देखील भरावा लागेल.
आता OTP टाकल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही नवीन पेजवर जाल आणि तुम्हाला कळेल की कोणती बँक खाती तुमची आधारशी लिंक आहेत.