महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही - अमित शाह
महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी फेटाळली आहे. तसं झालंच तर या निवडणुकांना सामोरं जाण्याची भाजपची तयारी आहे, या निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी फेटाळली आहे. तसं झालंच तर या निवडणुकांना सामोरं जाण्याची भाजपची तयारी आहे, या निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
गुजरातमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सततच्या कुरघोड्यांना कंटाळून गुजरातसोबत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजप तयारी करत असल्याची चर्चा आहे. पण ही केवळ चर्चाच असून तसे घडण्याची शक्यता नाही, असं शहा यांनी म्हंटलं आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी एका कार्यक्रमात शाह यांनी अनौपचारिक गप्पा मारताना हे वक्तव्य केलं. दरम्यान काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाविषयी मात्र अमित शाह यांनी मौन बाळगलं.