ट्रम्प यांचे धोरण अमेरिकेसाठी घातक - हिलरी
राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या लोकशाही मुल्ल्यांना धोका पोहोचवत आहेत. ते एखाद्या हुकुमशहा प्रमाणे वर्तन करत असून, अमेरिकेसाठी हे धोकादायक असल्याचे विधान अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी केले आहे.
नवी दिल्ली: राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या लोकशाही मुल्ल्यांना धोका पोहोचवत आहेत. ते एखाद्या हुकुमशहा प्रमाणे वर्तन करत असून, अमेरिकेसाठी हे धोकादायक असल्याचे विधान अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी केले आहे. हिलही या ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीतील उमेदवारही होत्या. एक वृत्तवाहिनीशी बोलताना हिलरी यांनी हे विधान केले आहे. त्या सध्या भारत दौऱ्यावर आहेत.
अमेरिकेचे राजणारण वळण घेणार
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीत आपला पराभव झाला. मात्र, या पराभवामागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हात होता, असा आरोप करतानाच भविष्यात अमेरिकेचे राजकारण वेगळे वळण घेणार असल्याचेही क्लिंटन म्हणाल्या. अमेरिकेचे अनेक माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणामुळे चिंतेत आहेत. कारण, ट्रम्प यांची धोरणे अमेरिकेला भलत्याच मार्गावर घेऊन जात आहेत.
ट्रम्प यांचा प्रचार अत्यंत भ्रामक
दरम्यान, निवडणूक प्रचाराबाबत बोलताना हिलरी म्हणाल्या की, मी एखाद्या आईप्रमाणे निवडणूक प्रचार केला. आई जसे आपल्या मुलाला आरोग्य चांगले राखण्यासाठी सल्ला देते. तसेच, मी केले. पण, माझे प्रतिस्पर्धी अत्यंत भ्रामक पद्धतीने प्रचार करत होते. जे फास्ट फूड खाण्यासाठी प्रेरित करत होते.