...आता कार कंपन्या बनवतायंत फेस मास्क; काय आहे कारण
कार कंपन्यांना फेस मास्क बनवण्याचे आदेश...
नवी दिल्ली : चीनमध्ये काही कार कंपन्यांनी आता गाड्यांची निर्मिती पूर्णपणे बंद केली आहे. आणि त्याऐवजी गाड्यांनी फेस मास्क बनवणं सुरु केलं आहे. चीनच्या कार कंपन्या गाड्या बनवण्याऐवजी आता फेस मास्क बनवत आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला आहे की, चीन सरकारला कार बनवण्याऱ्या कंपन्यांना फेस मास्क बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फेस मास्कची कमतरता -
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये दररोज १.५० कोटी मास्क तयार केले जातात. पण कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हे मास्क अतिशय कमी आहेत. कोरोना व्हायरस पसरल्यानंतर चीनमध्ये मास्कची मोठी कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळेच सरकारने चीनमधील मोठ्या कार कंपनी 'बीवायडी' आणि 'जनरल मोटर्स'ला गाड्यांऐवजी फेस मास्क तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
कार कंपन्यांकडून फेस मास्क तयार करण्यास सुरुवात -
कार निर्माता कंपन्यांनी सरकारने दिलेल्या आदेशाचं तात्काळ पालन करत, फेस मास्क बनवण्यास सुरुवात केली आहे. 'जनरल मोटर्स' आता दररोज १.७० कोटी मास्क तयार करत आहेत. त्याचप्रमाणे 'बीवायडी'नेही कार निर्मिती थांबवून केवळ फेस मास्क तयार करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना व्हायरसने चीनमध्ये निर्माण झालेल्या 'सार्स' या झपाट्याने पसरलेल्या रोगालाही मागे टाकलं आहे. सोमवारी सकाळपर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे ९१० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २००२-२००३मध्ये 'सार्स'च्या संसर्गामुळे ७७४ जणांचा मृत्यू झाला होता. कोरोना व्हायरसने गेल्या वेळी झालेल्या 'सार्स' या संसर्गजन्य रोगाहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसने जवळपास ३७,१९८ लोक संक्रमित झाल्याची माहिती आहे.