खुशखबर : १ एप्रिलपासून स्वस्त होणार रेल्वे प्रवास, या गोष्टींच्या किमतीतही कपात
१ एप्रिलपासून रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे.
नवी दिल्ली : १ एप्रिलपासून रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे. सरकारनं २०१८ सालच्या अर्थसंकल्पात ई-रेल्वे तिकीटावरचा सेवा कर कमी केला होता. यामुळे १ एप्रिल २०१८ पासून ट्रेन प्रवास स्वस्त होणार आहे. ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे.
या गोष्टीही स्वस्त होणार
सरकारनं अर्थसंकल्पात कच्चा काजूंवरची कस्टम ड्यूटी कमी करून २.५ टक्के केली होती. १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार असल्यामुळे काजूचे दरही कमी होतील. सध्या काजूवर ५ टक्के कस्टम ड्यूटी घेण्यात येत आहे.
सोलार टेंपर्ड ग्लास आणि सोलार बॅटरी
सोलार टेंपर्ड ग्लासवर असलेली बेसिक कस्टम ड्यूटी ५ टक्क्यांवरून शून्य टक्के करण्यात आली आहे. तसंच सोलार बॅटरीचे दरही कमी होणार आहेत.
एलपीजीच्या किंमतीही घटणार
लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजीच्या किंमतीमध्येही घट होणार आहे. सरकारनं १ एप्रिलपासून याचे दर २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
या गोष्टीही होणार स्वस्त
पीओएस मशीन, फिंगर स्कॅनर, मायक्रो एटीएम, आयरिस स्कॅनर, आरओ, मोबाईल चार्जर, देशात तयार होणारे हिरे, टाईल्स, तयार लेदर प्रॉडक्ट्स, मीठ, जीवनावश्यक औषधं, काडेपेटी, एलईडी, एचआयव्हीची औषधं, सिल्वर फॉईल, सीएनजी सिस्टिम या वस्तू स्वस्त होणार आहेत.