मुंबई : तुम्ही बॉलिवूडमधील धूम 2 सिनेमा पाहिला असेल. ज्यामध्ये हृतिक रोशन चोरी केल्यानंतर तिथे आपली छाप सोडतो. मागे एखादी खूण सोडून जातो. तो स्वत:ला खूप हुशार समजत असतो. त्याचंच अनुकरण काही चोरांनी केलं आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही चोरी पाहून पोलीसही चक्रावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये पाहू शकता की चोरी केल्यानंतर चोरांनी ब्लॅकबोर्डवर इट्स मी धूम 4 असं लिहिलं आहे. धूम चित्रपटाचे तीन पार्ट आले आहेत. या चोरांनी हा पार्ट चौथा असल्याचं म्हटलं आहे. 


चोरांनी ओडिशातील एका शाळेतून संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरल्या आणि ब्लॅकबोर्डवर एक मेसेज लिहिला आहे. यामध्ये त्यांनी 'इट्स मी धूम 4'. नबरंगपूरच्या खातीगुडा भागातील इंद्रावती हायस्कूलमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली.


शाळेच्या शिपायाला मुख्य गेट तुटलेले दिसले. या घटनेबद्दल मुख्याध्यापकांना सांगण्यात आलं. त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. चोरांनी मुख्याध्यापकांच्या केबिनमधील कंम्पूटर, एक प्रिंटर, स्कॅनर, साउंड बॉक्स आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेलं.


चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हानही दिले. ब्लॅकबोर्डवर लिहिले होते, 'ये मैं हूं - धूम 4, हम वापसी करेंगे.' चोरट्यांनी पुढे फळ्यावर लिहिलं की 'लवकरच येत आहे. शाळेतील मुलांनी आम्हाला पकडून दाखवावं. चोरट्यांनी ब्लॅकबोर्डवर अनेक फोन नंबरही लिहून ठेवला आहे.


पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांची दिशाभूल करण्यासाठी चोरांनी हा डाव रचल्याचंही सांगितलं आहे. मजेशीर बाब म्हणजे, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या फोन नंबरपैकी एक शाळेतील शिक्षकाचा असल्याचं स्थानिक ओडिशा टीव्हीने वृत्त दिलं आहे. दरोडेखोरांनी फलकावर आपला क्रमांक का लिहिला, याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे संबंधित शिक्षकाने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.