मुंबई : कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. शनिवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. आज पेट्रोलचे भाव १३ पैशांनी तर डिझेलचे भाव १० पैशांनी वाढले. याआधी शुक्रवारी पेट्रोलचे भाव १४ पैसे आणि डिझेलचे भाव १६ पैशांनी वाढले होते. येत्या काही दिवसांमध्ये इंधनाचे दर आणखी वाढतील, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यामुळे तेल कंपन्यांना नुकसान होत आहे, म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ८३.३७ रुपये तर डिझेलचे भाव ७१.९० रुपये प्रती लिटर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेनं इराणवर निर्बंध आणल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये कमी यायची शक्यता आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती एकसारख्या कमी-जास्ती होत आहेत. ओपेक देशांनी रोज १० लाख बॅरल कच्च्या तेलाचा जास्त पुरवठा करण्याची घोषणा केली होती. पण तरीही इंधनाची मागणी पूर्ण होणार नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढतील.


चार महानगरांमधली पेट्रोलची किंमत 


शहर                   किंमत (प्रति लीटर)


- दिल्ली                75.98 रुपये
- मुंबई                  83.37 रुपये
- कोलकाता           78.66 रुपये
- चेन्नई                  78.85 रुपये


चार महानगरांमधली डिझेलची किंमत


शहर                       दाम (प्रति लीटर)


- दिल्ली                    67.76 रुपये
- मुंबई                      71.90 रुपये
- कोलकाता               70.31 रुपये
- चेन्नई                      71.52 रुपये