बंगळुरु : दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचं मत तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. बंगळुरुमध्ये 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान 543 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर कर्नाटकच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांची बैठक बोलवली. Corona Third Wave


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएम बोम्मई ( Cm of karnatak ) यांनी म्हटलं की, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोनाची तिसरी लाट ( Third wave of corona ) ही मुलांसाठी अधिक धोकादायक ठरेल. कारण त्यांना सध्या वॅक्सीन दिली जात नाहीये. राज्य सरकारने मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी उडुपी आणि हावेरी जिल्ह्यात 'वात्सल्य' योजना सुरु केली आहे.


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, "आम्ही त्यांची प्रतिकाशक्ती तपासण्यासाठी बाल चिकित्सा आरोग्य शिबीर आयोजित करणार आहोत. पोषण आणि कमी विकास असलेल्या मुलांसाठी आवश्यक उपचार केले जातील.


"आम्ही योजनेवर काम करत आहोत. सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. मुलांना या व्हायरसपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करु. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये बाल चिकित्सा आयसीयूची व्यवस्था करण्यात निर्देश दिले आहेत.


संबंधित बातमी: मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी; महिलेचा मृत्यू


बैठकीनंतर बंगळुरु महानगरपालिकाने म्हटलं की, 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान 543 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 210 मुलं ही 0-9 वयोगटातील तर 333 मुलं ही 10-19 वयोगटातील आहेत.


0-19 वयोगटातील कोणत्याही मुलांच्या मृत्यूची माहिती नाही आहे. मुलांमध्ये लक्षणं खूप कमी आहेत.