मुंबई : राज्यासह देशात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात कमी आहे. मात्र यानंतरही कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेला नाही. या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची बाधा झाली तसेच अनेकांचा मृत्यूही झाला. देशात गेल्या काही दिवसांपासून लवकरच तिसऱ्या लाट (Corona Third Wave)  येणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर आता तिसरी लाट केव्हा पर्यंत येणार, याबाबतची वाच्छता आयसीएमआरचे प्रो. डॉ समीरन पांडा यांनी केली आहे. तसेच त्यांनी या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणारे मुद्दे हे सांगितले आहेत. (third wave of corona will come in India by the end of August ICMR said)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांडा काय म्हणाले? 


"देशात  ऑगस्टच्या अखेरपर्यंत कोरोनाची लाट येईल. या तिसऱ्या लाटेत देशात दररोज 1 लाख कोरोना रुग्णांचे निदान होईल", अशी भितीही डॉक्टर पांडा यांनी व्यक्त केली. तसेच कमी झालेले लसीकरण आणि लॉकडाऊनच्या निर्बंधात करण्यात आलेल्या शिथिलताच या तिसऱ्या लाटेला कारणीभूत असल्याचं पांडा यांनी म्हटलं.


तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय करायचं?


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून स्वत:चा बचाव कसा करायचा, याबाबतही आयसीएमआरने काही टीप्स दिल्या आहेत. 


नागरिकांनी विवाहसोहळ्यात तसेच पार्टीला जाण्यापासून स्वत:ला रोखावं. 


मास्क आणि सॅनिटायजरचा नेहमी वापर करावा. 


विनाकारण घराबाहेर पडू नये.


अधिकाअधिक लसीकरणावर भर द्यावा.