King Cobra Driking Water: रणरणत्या उन्हात नुसतं पाच मिनिटं बाहेर जाऊन आलं की, आपला घसा कोरडा पडतो. मग प्राणी पक्ष्यांचं कसं होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. तहानलेल्या कावळ्याची गोष्ट तर तुम्हाला माहिती असेलच. गोष्टीतील कावळा चोचीने दगड जमा करत मडक्यातील पाणी वर आणतो आणि तहान भागवतो. पण असं करणं प्रत्येक प्राण्याला शक्य नाही. असाच तहानलेल्या किंग कोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात किंग कोब्रा एक व्यक्ती बाटलीने पाणी पाजत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ 


58 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये त्यांनी 'दयाळू आणि नम्र व्हा, आपल्यावरही अशी वेळ येऊ शकते' असे कॅप्शन लिहिले आहे. बातमी लिहिपर्यंत या क्लिपला 68 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 4 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले होते.



प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी


या व्हिडीओमध्ये एक किंग कोब्रा जमिनीवर सरपटत असल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीने त्याची शेपटी माणसाने पकडली आहे. व्यक्ती स्नॅक कॅचरच्या मदतीने कोब्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रथम तो कोब्राच्या डोक्यावर थोडे पाणी ओततो, ज्यामुळे तो शांत होतो. यानंतर तो पाण्याची बाटली कोब्राच्या तोंडाला लावतो. कोब्रा त्यावर हल्ला करण्याऐवजी त्यातील पाणी शांतपणे पिऊ लागतो.


अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या


किंग कोब्रा हा सापांच्या सर्वात धोकादायक आणि विषारी प्रजातींपैकी एक आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्संनी या अधिकाऱ्यांना आभार मानत सांगितले की, हे खूप आनंददायी दृश्य आहे. तहानलेल्याला पाणी देणे ही चांगली गोष्ट आहे.