Diwali 2021 : या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलं खास गिफ्ट, कर्मचारी ही खूश
दिवाळीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. सुरत येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त खास भेट दिली.
मुंबई : दिवाळीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. यानिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देतात. त्याचप्रमाणे सुरत येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त खास भेट दिली. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आल्या. तेलाच्या वाढत्या किंमती आणि इतर बाबी लक्षात घेऊन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीत कंपनीने आपल्या 35 कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिल्या आहेत. ( company gave electric scooter as a diwali gift to employees)
पर्यावरण रक्षणासाठीही मदत
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देणाऱ्या सुरतमधील या सुप्रसिद्ध कंपनीचे नाव अलायन्स ग्रुप आहे. कंपनीचे संचालक सुभाष दावर म्हणाले की, हा मुद्दा केवळ मीडियाच्या मथळ्यातच राहत नाही तर कंपनीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. हे केवळ तेलाच्या खर्चातच बचत करणार नाही तर आमच्या कंपनीला पर्यावरण संरक्षणात योगदान देता येईल.
सुभाष पुढे म्हणाले की, त्यांचा नेहमीच पर्यावरणाच्या समरसतेवर विश्वास आहे आणि त्यांना निसर्गाच्या सहवासात राहायला आवडते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शक्य ते सर्व पावले उचलणे हा त्यांचा ध्यास असल्याचेही त्यांनी नमूद केले. कंपनीच्या या निर्णयाचा दुहेरी फायदा होणार आहे.
35 कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर
सुभाष दावर यांचा मुलगा चिराग दावर, जो व्यवसाय पाहतो ते म्हणाले की, कंपनीने त्यांच्या 35 कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल आणि इतर गोष्टींच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्कूटर मिळाल्याने कर्मचारी खूश
गुरुवारी दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना या स्कूटर्सचे वाटप करण्यात आले. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचारी चांगलेच खूश आहेत. यामुळे त्यांना आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.