या दिवसांत जाऊन नका ATM मध्ये, हॅकर्स रिकामं करतील अकाऊंट
डेबिट कार्डचा या ठिकाणी करू नका वापर
मुंबई : डेबिट कार्डबाबत केलेली एक चूक आपल्याला महागात पडू शकते. असा एकही दिवस जात नाही ज्या दिवसांमध्ये डेबिट कार्डच्या संदर्भातील कोणती चोरीची बाब समोर येत नाही. सायबर एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार डेबिट कार्ड क्लोनिंग करणारे चोर तारखा लक्षात ठेवून सामान्य नागरिकांना शिकार बनवतात.
या दिवसांमध्ये होते चोरी
सायबर एक्सपर्टने केलेल्या रिसर्चनुसार, महिन्याच्या चौथ्या आणि पाचव्या तारखेला चोरीच प्रमाण अधिक आहे. अनेक लोकांचा पगार हा 1 तारखेला होतो. आणि चार ते पाच तारखेपर्यंत लोनचा ईएमआय देखील कट होतो. त्यामुळे हॅकर्सला माहित असतं की, अनेक लोकांचे अकाऊंट या तारखेंपर्यंत भरलेले असतात आणि याचाच फायदा ते घेतात.
हॅकर्स 30 ते 31 तारखेला एटीएम मशीनमध्ये क्लोनिंगचा वापर करतात. हे क्लोनिंग स्क्रीमर डिवाइससोबत जोडले जाते. अनेक हॅकर्स हे स्क्रीमर दोन तारखेनंतर एटीएममध्ये काढून टाकले जाते. यामुळे हॅकर्सची माहिती फार लोकांना कळत नाही.
असा समजतो पासवर्ड
एटीएम कार्डचा पासवर्ड जाणून घेण्यासाठी हिडन कॅमेऱ्याची मदत घेतली जाते. हिडन कॅमेऱ्या हा एटीएमच्या सिलिंगला आणि की पॅडच्यावर लावला जातो. कुणीही आपलं पासवर्ड टाकलं की त्या कॅमेऱ्यात ते कैद होते. हिडन कॅमेऱ्यासोबतच हातांची बोटे देखील देखील त्यात कैद होतात.
या जागांवर होते कार्ड क्लोनिंगची घटना
सायबर एक्सपर्ट यांच्या माहितीनुसार, छोटी दुकानं, पेट्रोल पंप, रेस्टारंट या ठिकाणी कार्ड क्लोन होऊ शकतं. तसेच आपण अनेकदा पेट्रोल पंपमध्ये दुसऱ्याला एटीएम कार्ड देतो त्यामुळे या गोष्टी अधिक बळावतात.