मुंबई : साधारणपणे प्रत्येक घरात सकाळी गरम-गरम नाश्ता आणि चहा प्याला जातो. त्यानंतरच लोकं आपआपल्या कामाला लागता. जवळपास सर्वच घरांमध्ये नाश्त्यासोबत चहा पिण्यास प्राधान्य दिले जाते. पोहे, उपमा आणि रव्याची खीर इत्यादी गरमागरम फराळांसोबत चहा दिला जातो. परंतु हे करणं चूकीचं आहे असे सांगितले तर? आपण हे लहान पणापासून करत आलो आहोत, त्यामुळे यात काही चूक आहे असे आपल्याला वाटत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्‍याच जणांना तर नाश्तानंतर चहा प्यायले नाही तर, त्यांचा नाश्ता पूर्ण झाला असे त्यांना वाटत नाही. जोपर्यंत त्यांना चांगला नाश्ता वाटत नाही. पण, न्याहारीनंतर चहा पिणे ही आरोग्यासाठी सर्वात हानिकारक सवय ठरू शकते. न्याहारीसोबत चहाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.


नाश्तानंतर चहा पिणे हानिकारक आहे का?


अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, चहासोबत नाश्ता करणे योग्य आहे का, मग आम्ही तुम्हाला सांगतो की तज्ज्ञांच्या मते, केवळ पोहेच नाही तर इतर अनेक प्रकारचे स्नॅक्स जे लोक चहासोबत खातात ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ते खूप हानिकारक आहे असे फूड साइंस आणि आयुर्वेदात मानले जातात, नाश्ता आणि चहा हे दोन भिन्न पदार्थ आहेत जे कधीही एकत्र सेवन करू नयेत.


आयुर्वेदात याविषयी सांगितले आहे की, अन्नामुळे एक प्रकारची शक्ती मिळते, अशा स्थितीत 2 विरुद्ध ऊर्जा असलेले अन्न एकत्र सेवन केल्यास शरीरातील कार्यप्रणाली नीट काम करू शकत नाहीत, ज्यामुळे त्याचा वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत हे दोन्ही शरीरात एकत्र गेल्यास ते हानिकारक ठरतात.


तज्ज्ञांच्या मते, अशा हानिकारक अन्नाच्या मिश्रणामुळे शरीरात विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. हे आपल्या पचनसंस्थेवर आणि चयापचय प्रक्रियेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात.


हे लक्षात घेण्यासारखे आहे की, उलट्या, मायग्रेन आणि अपचन सारख्या समस्या अनेकदा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे होतात, यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर, कोणत्याही पदार्थासोबत चहा पिऊ नका.


नाश्ता केल्यानंतर काही वेळाने तुम्ही चहाचे सेवन करू शकता, यामुळे आरोग्याचे फारच कमी नुकसान होते. शक्यतो रिकाम्या पोटी चहा कधीच पिऊ नका.