मुंबई : मुलं लहानाची मोठी होत असताना त्यांना आई- वडिलांकडून बऱ्याच गोष्टींची शिकवण दिली जाते. या गोष्टींमध्ये वागण्याबोलण्याचा आणि संस्कारांचा समावेश असतो. नकळतच आपलं बाळ समाजात एक चांगलं व्यक्ती म्हणून ओळखलं जाण्याची इच्छा आईवडील मनोमन बाळगून असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. त्यामुळं घरात लहान मूल असल्यास मोठी मंडळीसुद्धा काही चुकीचं वागत नाहीत. मोठ्यांकडून काही महत्त्वाची मूल्य कमी वयातच मुलांच्या मनावर बिंबवल्यास योग्य ठरतात. याच मुल्यांमधील एक म्हणजे पैशांचं महत्त्वं. 


पैसे आणि पाण्याची तुलना बऱ्याचदा केली जाते. जसं पाणी ओंजळीत थरत नाही, तसंच पैसेही आज आहेत आणि उद्या नाही. त्यामुळं त्यांचं महत्त्वं जाणून घेणं कधीही महत्त्वाचं. भारतामध्ये अतिशय मानाचं स्थान असणाऱ्या आणि श्रीमंती असतानाही त्याचा गर्व नसणाऱ्या सुधा मूर्ती यांचंही हेच म्हणणं. (this is how Sudha Murthy taught Her Children The Value Of Money)


इंफोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या एक उत्तम आणि तितक्याच लोकप्रिय लेखिकाही आहेत. त्यांच्या बऱ्याच पुस्तकांना दमदार प्रतिसाद मिळाला आहे. सुधा मूर्ती यांनी कायमच त्यांच्या मुलांना पैशांचं महत्त्वं जाणण्याची शिकवण दिली आहे. 


पालक मुलांना बऱ्याचदा पैशांचं आमिष दाखवून काही कामं करवून घेतात किंवा त्यांना पैसे देण्याचं आश्वासन देतात. पण, असं करणं सपशेल चुकीचं असल्याचं सुधाजींचं मत. 


श्रीमंती असतानाही सुधा मूर्ती यांनी कधीच आपल्या मुलांना मोठमोठ्या पार्टीला हजेरी लावू दिली नाही. अवाजवी खर्च करण्यापासूनही त्यांनी मुलांना कायमच रोखलं. आपल्याकडील पैशांपासून कायम गरजूंना मदत होईल का हा विचार मनात ठेवावा अशी शिकवण सुधा मूर्ती यांनी त्यांच्या मुलांना दिली. 



पैसे कमवण्यासाठी लागणारी मेहनत कमी नसते. त्यामुळे प्रत्येकानेच या प्रयत्यांनाही महत्त्वं देत पैशांची श्रीमंती दाखवण्यापेक्षा मनाची श्रीमंती दाखवणं कधीही उत्तम, हाच संदेश त्यांच्या या शिकवणुकीतून मिळत आहे.