जोधपूर : सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर गेल्या २ दिवसांपासून जेलमध्ये आहे. ५ वर्षाची शिक्षा झालेल्या सलमानने आज कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. काही वेळेतच यावर निर्णय येईल पण एका गोष्टीमुळे सलमानची जामीन याचिका फेटाळली जाऊ शकते.


काय आहे नियम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बेल इस रूल अंड जेल इस एक्सेप्शन'. याचा अर्थ असा आहे की बेल हाच नियम आहे पण जेलच्या खूप कमी प्रकरणात तो मिळेल. बेल देणं हा जजचा अधिकार असतो. बेल द्यावा की नाही द्यावा हे पूर्णपणे जजवर अबलंबून असतं. सलमान विरोधात कठोर पुरावे असल्याने त्याला शिक्षा झाली. सरकारी पक्षाने खूप मजबूत पुरावे कोर्टासमोर ठेवले.


जामीन नाकारला जाणार?


सेशन कोर्टाचे जज असं म्हणू शकतात की, सलमान विरोधात खालच्या न्यायपालिकेत आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे जामीन नाकारला जाऊ शकतो. दुसरीकडे सलमानच्या कंडक्टच्या आधारावर सेशन कोर्टाचे जज त्याला जामीन देऊ शकतात.