मुंबई : बऱ्याच लोकांना काहीना काही गोष्ट संग्रह करण्याची सवय असते. काही आपला छंद जोपासण्यासाठी किती पैसे खर्च करण्याची तयारी दाखवतात. त्यांपैकी काही लोकांना नाण्याचा संग्रह करण्याची देखील आवडत असते. त्यामुळे त्यांना हवं त्या प्रकारचं नाणं मिळवण्यासाठी ते जास्त पैसे देण्याचीही तयारी दर्शवतात.  सोशल मीडियावरती अशी लोकं जाहिरात टाकतात आणि लोकांकडून त्यांना हवं ते नाणं मिळालं की त्यासाठी ते पैसे देखील मोजतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावरती एक रुपयाच्या नाण्याची मागणी वाढत आहे. ज्यासाठी लोकांना 3.75 लाख रुपये मिळत आहेत. म्हणजेच त्या नाण्याच्या मुल्यापेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.


कोणत्या नाण्याला मागणी?


1942 मध्ये जारी करण्यात आलेल्या या जुन्या नाण्यावरती ब्रिटिश सम्राट जॉर्ज सहावा यांचा फोटो छापलेला असाव. काही महिन्यांपूर्वी अशाच एका जुन्या नाण्याचा 10 लाख रुपयांना लिलाव झाला होता.


जर तुमच्या घरातही अशी दुर्मिळ नाणी पडून असतील, तर अशा नाण्यांच्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये  मिळू शकतात. अनेक वेबसाइट अशा नाण्यांचा ऑनलाइन लिलाव करण्याची सुविधा देत आहेत.


या नाण्याची वैशिष्ट्ये काय आहेत?


वास्तविक, अनेक प्रकारची देशी-विदेशी नाणी आहेत, जी काही वर्षांपूर्वी बंद पडली होती आणि ती आता खुप कमी पहायला मिळतात. ज्या नाण्याबद्दल आपण इथे बोलत आहोत, हे एक दुर्मिळ एक रुपयाचे नाणं आहे, जे 1942 मध्ये ब्रिटिश राजवटीत जारी करण्यात आले होते. या नाण्याच्या एका बाजूला इंग्रजी आणि उर्दूमध्ये One Rupee India 1942 लिहिलेले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सम्राट जॉर्ज सहावा यांचे चित्र छापलेले आहे.


नाणी कोण विकत घेईल?


तुमच्‍या मनात असा विचार असले तरी अशी नाणी कोण विकत घेतं? तर अशा नाण्यांचे शौकीन भरपुर आहेत,  खरी पुरातन वास्तू, नाणी किवा फाटलेल्या नोटा जमा करणे हे असे  छंद जोपासणारे अनेकजन ही नाणी तुम्ही म्हणाल त्या किमतीला विकत घेतात.  आशा मानसांची जगात उणीव नाही. आशा लोकांकडे पूर्वीपासून पुरातन वास्तू किंवा नोटांचा संग्रह असतो.


तुमच्या घरातही अशी अनेक जुनी नाणी असू शकतात. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांनीही ब्रिटिशकालीन जुनी नाणी जतन केली असतील तर अशी दुर्मिळ नाणी तुम्हाला रातोरात मालामाल करू शकतात.