नवी दिल्ली : Netflix हा ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वांच्याच अवडतीचा आहे. लॉकडाऊन दरम्यान चित्रपटगृह बंद असल्यामुळे अनेक नवे चित्रपट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. शिवाय यावर प्रदर्शित झालेल्या अनेक वेब सीरिजने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आताच्या या इंटरनेट युगात कित्येक लोक मनोरंजनासाठी Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मात्र आता Netflix कंपनीने नव्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नव्या ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली खास सुविधा Netflixने बंद केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटफ्लिक्सने जगभरात विनामूल्य सब्सक्रिप्शन घेऊन चित्रपट आणि  वेब सीरिज पाहणाऱ्या ग्राहकांना धक्का दिला आहे. नव्या ग्राहकांसाठी असणारं फ्रि सब्सक्रिप्शन Netflix कंपनीकडून बंद करण्यात आलं आहे. अफगानिस्तान हा देश वगळता सर्व देशांमधील फ्रि सब्सक्रिप्शन ही सुविधा बंद करण्यात आल्याची घोषणा Netflixने केली. 


कंपनीच्या सांगण्यानुसार ग्राहक Netflixवर फ्रि साइन-अप करू शकतात. परंतु चित्रपट आणि वेब सीरिजचा आनंद घेण्यासाठी नव्या ग्राहकांना शुल्क मोजावे लागणार आहे. याआधी Netflix सर्व नव्या ग्राहकांना फ्रि सब्सक्रिप्शनची सुविधा पुरवत होता. 


मात्र, फ्रि सब्सक्रिप्शनचा ग्राहक गैरफायदा घेवू लागले होते. एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर ग्राहक दुसरा ई-मेल आयडी तयार करून फ्रि सब्सक्रिप्शनची मजा घेत होते. या कारणामुळे Netflix कंपनीने फ्रि सब्सक्रिप्शन सुविधा नव्या ग्राहकांसाठी बंद केली आहे.