नवी दिल्ली : पंजाबच्या जेलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यातील हायटेक जेल असलेल्या फरीदकोट जेलमधून मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जेलमध्ये बंद एका कैदीने जवळपास 3 मिनिटाचा हा व्हिडिओ बनवून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पंजाबचे डीजीपी सुरेश अरोडा आणि कारागृह मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धमकी देणारा आरोपी ए कॅटेगरीचा गुन्हेगार आहे. गँगस्टर गोबिंद सिंह असं त्याचं नाव आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब यांची खोटी शपथ घेतली. त्यांनी त्याची माफी मागावी असं या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं आहे. फेसबूकवर त्य़ाने हा व्हिडिओ टाकला आहे.


जेलमध्ये बंद गँगस्टरने दावा केला आहे की, त्याच्याकडे मुख्यमंत्री आणि डीजीपींचा नंबर नव्हता म्हणून त्याने व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे.