श्रीनगर : भारताने शांतीसाठी केलेल्या हजारो प्रयत्नानंतर ही पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.


३ जवान शहीद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार केला आहे ज्यामध्य़े ३ भारतीय जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून केरी सेक्टरमध्ये भारतीय पोस्टला लक्ष्य केलं. 


पाकिस्तानचा गोळीबार


पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारामध्ये ३ जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये एका अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. १ जवान या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाला आहे. अचानक झालेल्या या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी देखील पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं.