मुंबई : देशात काही ठिकाणी आणि महाराष्ट्रात काही भागात पुढील तीन दिवसात पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. वादळासह जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने  (India Meteorological Department) वर्तविला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसना झाले आहे. बीडमध्ये नदीला पूर आला होता. तर कोकणात चिपळूण, संगमेश्वर येथेही दोन दिवसांपूर्वी मध्यम, तुरळक पाऊस झाला. देशात पश्चिम हिमालय आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात 11 मे ते 13 मे या काळात  पश्चिम हिमालय प्रदेशात (Western Himalaya) अनेक ठिकाणी वादळ आणि वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वायव्य मैदानाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) व्यक्त केली आहे.


या ठिकाणी पावसाची शक्यता


नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) 11 मे पासून पश्चिम हिमालयीय प्रदेश आणि उत्तर-पश्चिम भारतातील (North-West India) मैदानी भागावर परिणाम करेल. अरबी समुद्रावरुन निम्न स्तरावरील वारे आणि ओलावा येण्यामुळे पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागाच्या बर्‍याच भागात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वायव्य भारतातील मैदानाच्या काही भागातही वादळासह पाऊस पडेल. या काळात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात 12 आणि 13 मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   


पूर्व भारतालाही पावसाचा बसणार फटका  


दक्षिणेकडून निम्न स्तरावरील वारे येत असल्याने आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याशी संपर्क येणार असल्याने ईशान्येकडील राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. यासह, पुढच्या 4-5 दिवसांत पूर्वेकडील काही भागात वादळी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.