जंगल सफारी करताना गाडीचा पाठलाग करणारे 2 वाघ कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ समोर आल्यानंतर 3 जण निलंबित
रायपूर : छत्तीसगडमध्ये रायपुर जंगल सफारी वेळी एक अनोखी घटना घडली. सफारी गाडीचा पाठलाग करणारे दोन वाघ कॅमेऱ्यात चित्रित झाले. पर्यटकांना यावेळी रोमांच अनुभवता आला खऱा मात्र हे चित्रण करणाऱ्या सफारी गाईडला त्याची नोकरी गमवावी लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण पर्यटकांचा जीव धोक्यात घालून असा व्हिडिओ करणं सफारी गाईडला महागात पडलं.
रायपूरच्या या जंगल सफारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी शूट झाला असल्याचं वन विभागाकडून सांगण्य़ात आलं आहे.
दोन वाघांच्या अतिशय जवळ ही गाडी होती. या गाडीमधून एका प्लास्टिकचा तुकडा लटकत होता. त्याला धरण्य़ाचा या वाघाने प्रयत्न केला. गाडीच्या मागे तो धावत सुटला. गाडीमध्ये असलेल्या व्यक्तीने गाडी जोरात पुढे नेण्यासाठी सांगितलं.
या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. या प्रकरणात सध्या 2 गाईड आणि ड्राईव्हरला निंलंबित करण्यात आलं आहे.