मुंबई : गेल्या काही वर्षआंमध्ये तरुणाईचा कल बऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांकडे पाहायला मिळाला. शिक्षण अमुक एका क्षेत्रात घेऊनही काही वर्षे त्याच क्षेत्रात नोकरी केल्यानंतर एकसारखेपणामुळं त्रासलेल्यांची संख्या सध्या जास्त. अरे यार कंटाळा आलाय, आयुष्यात काहीच घडत नाहीये, तोचतोचपणा आलाय मित्रा... असं म्हणणारे काही मित्र तुमच्याही यादीत असतील. (Tips and precautions while changing career read details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंबहुना मित्र असण्यापेक्षा तुम्हीही असं म्हणू शकता ही शक्यता नाकारता येत नाही. कमी पगार, कामात असणारं असमाधान, काम आणि खासगी आयुष्यात समतोल राखण्यात आलेलं अपयश, नको ते राजकारण आणि वरिष्ठांकडून न मिळणारी अपेक्षित प्रशंसा या आणि अशा अनेक कारणांमुळे सध्याची पिढी करिअरच्या वाटाच बदलण्याच्या विचारात दिसते. 


ही बाब ऐकणं कितीही सोपं असली तरीही ती प्रत्यक्षात अनुभवताना मात्र प्रचंड आव्हानं येतात. फक्त करिअरमध्येच नाही तर या एका निर्णयानं खासगी आयुष्यातही उलथापालथ पाहायला मिळते. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. 


- शक्य असल्यास सध्याची नोकरी न सोडता सुट्टीच्या दिवसांमध्ये करिअरचे नवे पर्याय शोधा. 


- वर्तमानात तुम्ही नोकरी करत असलेल्या ठिकाणी वरिष्ठांशी असणारे संबंध तोडू नका. पुढे जाऊन तुम्हाला त्यांची गरज भासू शकते हे विसरु नका. 


- येत्या काही महिन्यांमधील खर्च नजरेत ठेवा आणि पुढचे निर्णय घ्या. अवाजवी खर्च टाळण्यास सुरुवात करा. 


- तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे याचा निर्णय घेतला असल्यास त्या क्षेत्राशी संबंधित एखाद्या ठिकाणी नोकरीची संधी आहे का यावर नजर ठेवा. पगार कमी असला तरीही अनुभव महत्त्वाचा हे विसरु नका. 


- तुमचा यापूर्वीचा अनुभव व्यर्थ गेला असं मुळीच समजू नका. सध्याच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या क्षेत्राला अनुसरून होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा. कोणताही अनुभव व्यर्थ नसतो हे लक्षात ठेऊनच पुढे जा.