Smart Tips : नव्या झाडूतून भुसा पडतोय? करून पाहा `हे` सोपे उपाय
Broom Dust : घर कितीही मोठं असो किंवा कितीही लहान, त्या घरात केरसुणी, झाडू असतेच. केर काढण्यासाठी, घरासला स्वच्छ ठेवण्यासाठी वापरली जाणारी ही केरसुणी लक्ष्मीचंही प्रतीक असते असं म्हणतात.
How to clean dust from new broom : तुमच्या घरात झाडू आहे का? असा प्रश्न विचारल्याच समोरची व्यक्ती एकटक तुमच्याकडे पाहतच राहील. कारण हा प्रश्नच तसा आहे. शहरापासून खेड्यांपर्यंत प्रत्येक घरात केरसुणी, झाडू हमखात असतो. घरातला केर काढण्यासाठी, घर स्वच्छ ठेवण्यासाठी या झाडूचा वापर केला जातो. बरं या झाडूचेही वेगवेगळए प्रकार. पण, एक प्रकार मात्र हमखास सर्वांच्याच घरात असतो. जिथं झाडूचा पिसारा एका बाजूला आणि ते पकडण्यासाठीची लांब दांडी दुसऱ्या बाजुला असते.
दाराच्या आड, स्वयंपाकघरात, किंवा मग गावाकडे घरं असल्यास अंगणात एका बाजूला हा झाडू ठेवला जातो. एक प्रकारच्या वनस्पतीची सुकलेली पानं आणि काड्याकुड्या एकत्र बांधून ही आगळीवेगळी केरसुणी तयार केली जाते. अशा या केसरसुणीचे असंख्य उपयोग. पण, ती बाजारातून घरी आणण्यापूर्वी तिची पूजा केली जाते.
केरसुणीसुद्धा लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळं तिला हळदीकुंकू वाहिलं जातं. ज्यानंतरच ती वापरता येते. केरसुणीला पाय लागला तरीही आपण तिच्या पाया पडतो, तिला सहसा ओलांडून जात नाही. अशी ही केरसुणी नवीकोरी असते तेव्हा केर काढण्यासाठी म्हणून हातात घेतली असता तिच्यामधून बराच भुसा पडतो.
केर कमी आणि भुसा जास्त, अशीच काहीशी परिस्थिती घराघरांमध्ये पाहायला मिळते. बऱ्याचदा तर, घराच्या कानाकोपऱ्यात आणि पांढऱ्या रंगाची फरशी असल्यास हा भुसाच सर्वत्र दिसू लागतो. मग अशावेळी करावं तरी काय?
भुसा काढून केरसुणी स्वच्छ तरी कशी ठेवावी?
प्रत्येक गृहिणीकडे काही अफलातून उपाय असतात, केरसुणीचा भुसा काढण्यासाठीसुद्धा असेच काही उपाय आहेत. ज्यातला पहिला म्हणजे नवी केरसुणी आणल्यानंतर ती दाराबाहेरच झाडून घ्या. आता तिला घरात आणून न्हाणीघरात किंवा अशा एका ठिकाणी ठेवा जिथं तुम्ही ती पाण्यानं भिजवू शकाल. जसजसं पाणी ओताल, तसतसा भुसा पाण्यासोबत वाहत जाईल. यानंतर केरसुणी लख्ख सूर्यप्रकाशात किंवा मोकळ्या जागेत पूर्ण कोरडी करा. ती कोरडी होण्यासाठी साधारण तीन – चार दिवसांचा अवधी लागू शकतो.
हेसुद्धा वाचा : मै नही तो कौन बे? Mahindra XUV700 ला कारप्रेमींचा तुफान प्रतिसाद, Features पाहून प्रेमातच पडाल
आणखी एक उपाय म्हणजे, केरसुणी आणल्यानंतर ती सवयीप्रमाणं घराच्या बाहेर झटकून घ्या. आता मध्यम आकाराचा कंगवा घेऊन केसांवर फिरवतो त्याचप्रमाणं तो केरसुणीवर फिरवा. असं केल्यानं झाडूचा भुसा सहजपणे निघून जातो. केरसुणीचा भुसा कमी करण्याचे हे दोन सोपे उपाय. वापरून पाहा आणि मैत्रिणींसोबतही शेअर करा.