नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन सुरु असला तरी काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदीर प्रशासनाने भक्तांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मंदीराचा प्रसाद सोमवारपासून अर्ध्या किंमतीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुपती देवस्थान ट्रस्टतर्फे लवकरच याची सुरुवात होणार आहे. यानुसार भक्तांना ५० रुपयात मिळणारा लाडू प्रतिनग २५ रुपयांमध्ये मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हे वाचा : तिरुपती देवस्थानला लॉकडाऊनचा फटका; नुकसानाचा आकडा वाचून बसेल धक्का


एखाद्या भाविकाला १ हजारपेक्षा अधिक लाडू पाहीजे असतील तर त्याने आपले नाव, मोबाईल नंबरसह तपशिल पाच दिवस आधी tmlbulkladdus@gmail.com वर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांच्या मागणीनुसार लाडू बनविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी १८००४२५४१४१ किंवा १८००४२५३३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


तिरुमला तिरुपती देवस्थानकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार व्यंकटेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंदिर प्रशासनाकडून प्रसाद स्वरुपात देण्यात येणारा तिरुपती लाडू मोफत देण्यात येणार होता. पण कोरोना संकटानंतर इथली परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान अर्थात TTD कडून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मंदिर प्रशासनाला जवळपास ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 



हे वाचा : तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय


तिरुमला मंदिर देवस्थानकडून प्रसादम स्वरुपात तीन प्रकारचे लाडू तयार करण्यात येतात. ज्यामध्ये मोठे, लहान आणि प्रसादम लाडूंचा समावेश असतो. मंदिर प्रशासनाकडून मोठ्या आकाराचे एकूण ३ हजार लाडू दररोज तयार करण्यात येतात. ज्यामध्ये एक लाडू हा ७०० ग्रॅम वजनाचा असतो.



यापैकी काही लाडू हे तिकीट धारकांना ठराविक अर्जित सेवेसाठी मोफत देण्यात येतात. तर, इतर ला़डू हे व्हीव्हीआयपींसाठी नगास २०० रुपये दराने विकण्यात येतात. तर, लहान लाडू हे १७५ ग्रॅम वजनाचे असतात. दर दिवशी असे जवळपास ३ लाखांहून अधिक लाडू तयार करण्यात येतात. मंदिरय प्रशासनाला हे लाडू तयार करण्यासाठी प्रती नग ३९ रुपये इतका खर्च येतो. 


लॉकडाऊननंतरच्या काळात दर महिन्याला मंदिराला २०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दोन महिन्यांचा कालावधी पाहता हा आकडा ४०० कोटींवर पोहोचला आहे. असं असलं तरीही या कठीण प्रसंगातही मंदिर प्रशसनाकडून कायमस्वरुपी, कंत्राटी आणि पेंशनधारी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात येणार आहे.