तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय

जानेवारी महिन्यापासून....

Updated: Jan 20, 2020, 10:32 AM IST
तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय
संग्रहित छायाचित्र

मुंबई : यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीलाच तिरुपती देवस्थानकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांमधत्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार व्यंकटेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंदिर प्रशासनाकडून प्रसाद स्वरुपात देण्यात येणारा तिरुपती लाडू मोफत देण्यात येणार आहे. 

प्रत्येक भाविकाला एक लाडू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने गोड करण्यात आला असं म्हणायला हरकत नाही. देशातील सर्वात श्रीमंत मंदिर प्रशासन म्हणून ओळख असणाऱ्या तिरुपती देवस्थानाला दररोज जवळपास ८० हजार भाविक भेट देतात. सण- उत्सवांच्या दिवशी हाच आकडा एक लाखांवरही पोहोचतो. भाविकांची हीच गर्दी, श्रद्धा पाहता प्रत्येकालाच प्रसाद स्वरुपातील हा प्रसिद्ध असा 'तिरुपती लाडू' मिळावा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

तिरुमला मंदिर देवस्थानकडून प्रसादम स्वरुपात तीन प्रकारचे लाडू तयार करण्यात येतात. ज्यामध्ये मोठे, लहान आणि प्रसादम लाडूंचा समावेश असतो. मंदिर प्रशासनाकडून मोठ्या आकाराचे एकूण ३ हजार लाडू दररोज तयार करण्यात येतात. ज्यामध्ये एक लाडू हा ७०० ग्रॅम वजनाचा असतो. यापैकी काही लाडू हे तिकीट धारकांना ठराविक अर्जित सेवेसाठी मोफत देण्यात येतात. तर, इतर ला़डू हे व्हीव्हीआयपींसाठी नगास २०० रुपये दराने विकण्यात येतात. तर, लहान लाडू हे १७५ ग्रॅम वजनाचे असतात. दर दिवशी असे जवळपास ३ लाखांहून अधिक लाडू तयार करण्यात येतात. मंदिरय प्रशासनाला हे लाडू तयार करण्यासाठी प्रती नग ३९ रुपये इतका खर्च येतो.